Solapur Municipal Corporation  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur News : ठराव होऊनही ३० कोटींच्या ठेवीकडे दुर्लक्ष

सुमारे ३० लाखांचा फटका : अमोल शिंदे, चेतन नरोटे यांच्या लक्षवेधीमुळे बाब उघड

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आयसीआयसीआय बँकेत कामगारांच्या भविष्य निर्वाण निर्वाह निधीसह ३० कोटीच्या ठेवी ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेऊन दोन महिने उलटले तरी संबंधित बँकेत ठेवल्या नसल्याची बाब नगरसेवक अमोल शिंदे आणि चेतन नरोटे यांच्या लक्षवेधीमुळे उघडकीस आली. ठेवीस विलंब झाल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे. बुधवारी तत्काळ या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सभागृहात दिले.

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सायंकाळी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी नालेसफाईतील कथित कंत्राटातील भ्रष्टाचार प्रकरणातील चौकशी अहवाल आयुक्तांकडे सादर झाला आहे का? याकडे लक्ष वेधले. या प्रकरणातील अहवाल प्राप्त झाला असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी सह तीस कोटींच्या ठेवी बंधन बँकेऐवजी आयसीआयसीआय बँकेत ठेवण्याचा निर्णय २ महिन्यापूर्वी स्थायी समितीमध्ये घेतला होता.

त्यानुसार त्या ठेवी संबंधित बँकेत ठेवल्या आहेत की नाही ? अशी लक्षवेधी शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी मांडली. दोन महिने झाले तरी ही रक्कम जैसे थे आहे. विलंब झाल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसणार आहे. तातडीनेही रक्कम ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दोन महिन्याचे सात टक्के प्रमाणे सुमारे ३० लाखाचा फटका बसणार आहे. या रकमेवरील ७ टक्के व्याज बुडणार असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. ठेवी ठेवण्यात आले नाहीत याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

याबाबत खुलासा करण्यासाठी काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे त्याचबरोबर भाजपाच्या नगरसेविका तथा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी खुलासाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत दुजोरा दिला. महापालिका आयुक्तांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी सभागृहापुढे खुलासा केला.

टीव्ही ठेवण्यासंदर्भात बुधवारी निर्णय घेण्यात येणार आहे मात्र तूर्तास सेविंग खात्या अंतर्गत साडेतीन टक्के व्याज या ठेवींवर मिळत आहे, असे डॉ. जवळगेकर म्हणाले. गेल्या दोन महिन्यापासून या ठेवी अद्याप स्थायीच्या निर्णयानुसार ठेवण्यात आल्या नसल्याने महापालिकेला आर्थिक फटका बसत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT