सोलापूर

Solapur Ganesh Visarjan : विसर्जनावेळी जमा झाले २३ टन निर्माल्य!

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम; दीड हजार सदस्यांचा सहभाग

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील गणेश विसर्जन करण्यात येणाऱ्या विविध ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे एक हजार ६०३ सदस्यांनी २३ हजार २५७ किलो उपयुक्त निर्माल्याचे तर संकलन केले. जमा केलेल्या निर्माल्यातून प्लास्टिक थर्माकोल व इतर विघटित न होणाऱ्या वस्तू वेगळ्या करून उर्वरीत निर्माल्य सेंद्रिय खतासाठी वापरण्यात येणार आहे.

पद्मश्री तीर्थरूप डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्दशी निमित्त निर्माल्या पासून खत निर्मिती हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी श्री सिद्धेश्वर तलाव (गणपती घाट) येथे सुमारे २ हजार ९७७ किलो उपयुक्त निर्माल्य तर १३ घंटा गाड्या अनुपयुक्त निर्माल्य संकलन झाले. श्री सिद्धेश्वर तलाव ( विष्णू घाट ) येथे ६ हजार १०९ किलो उपयुक्त तर २१ घंटा गाड्याअनुपयुक्त निर्माल्य संकलन झाले.

विडी घरकुल म्हाडा विहीर येथे ४ हजार ४५६ किलो उपयुक्त तर १० घंटा गाड्या अनुपयुक्त निर्माल्य संकलन झाले. धर्मवीर संभाजीराजे तलाव (कंबर तलाव) येथे ४ हजार ९४७ किलो उपयुक्त तर १९ घंटा गाड्या अनुपयुक्त निर्माल्य संकलन झाले. हिप्परगा तलाव येथे ४ हजार ७६८ किलो उपयुक्त तर ११ घंटा गाड्या अनुपयुक्त निर्माल्य संकलन झाले. एकूण २३ हजार २५७ किलो उपयुक्त निर्माल्य संकलन झाले. तर ७४ घंटागाड्या अनुपयुक्त निर्माल्य संकलन झाले.

या अभियानामध्ये सोलापूर शहरातील तसेच सोलापूर लगतच्या गावातील जसे की मोहोळ तालुका, उत्तर सोलापूर तालुका, दक्षिण सोलापूर तालुका, अक्कलकोट तालुका यातील जवळपास १ हजार ६०३ सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी आणलेली हार, फुले, दुर्वा व अन्य निर्माल्य साहित्य हे विहीर, तलाव तसेच पाण्याचे विविध स्त्रोत येथे विसर्जित न करता प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांकडे जमा केले. जमा केलेल्या निर्माल्यातून प्लास्टिक थर्माकोल व इतर विघटित न होणाऱ्या वस्तू वेगळ्या करून त्याचे संकलन केले. जमा केलेले निर्माल्य सेंद्रिय खतासाठी घेऊन उर्वरित जमा झालेले साहित्य महापालिकेच्या घंटागाड्यामार्फत पाठवले.

महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, महापौर विनायक कोंड्याल, सहाय्यक आयुक्त संदीप कारंजे तसेच शहरातील नागरिकांनी देखील या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत निर्माल्य जमा केले. प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर शहरा व्यतिरिक्त बार्शी कुर्डूवाडी पंढरपूर वेळापूर अकलूज इत्यादी विविध ठिकाणी हा पर्यावरण रक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. मागील चार वर्षापासून सोलापूर शहरामध्ये प्रतिष्ठान मार्फत हा उपक्रम राबविण्यात येतो व यातून निर्माण झालेला खत हा प्रतिष्ठान मार्फत केलेल्या वृक्ष लागवडीसाठी व उर्वरित शिल्लक खत शेतकऱ्यांना शेतामध्ये वापरण्यासाठी दिला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT