सोलापूर

Tuljapur Bus Service : पौर्णिमेला तुळजापूरसाठी १५५ बसेस

कोजागिरीसाठी विशेष व्यवस्था, घटस्थापनेपासून दररोज जादा बस

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : नवरात्रोत्सवासह कोजागिरीसाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणासह अन्य राज्यातून शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे कोजागिरीसाठी सोलापूर विभागाने १५५ बस सोडण्याचे नियोजन आहे.

सोलापूर-तुळजापूरसह अन्य मार्गांवर एसटी बसेसची संख्या निश्चित करून ती सोडण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात वाहतुकीची गैरसोय होऊ नये, सुरक्षित आणि सुखकर प्रवास करता यावा, यासाठी महामंडळाने योग्य नियोजन केले आहे. यात्रेच्या काळात राज्यातील सर्वच सवलतधारक प्रवाशांना सवलतीतून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी महामंडळाच्या बसेसचा लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दररोजचे असे आहे नियोजन

घटस्थापनेला २१, द्वितीयेला २४, तृतियेला २०, चतुर्थीला ३८, पंचमीला ३६, षष्ठीला ३२, सप्तमीला ४४, अष्टमीला ४३ तर नवमीला २७ बसेस धावणार आहेत. मात्र अश्विनी पौर्णिमेला सर्वाधिक म्हणजेच १५५ बसेस धावणार आहेत.

तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांचा विचार करून नऊ माळेतील प्रत्येक माळेसाठी बसेसची वेगवेगळी संख्या निश्चित केली आहे. यामुळे भाविकांना प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाही. याची काळजी घेतली असून यातील बसची संख्या वाढतीलही.
- अमोल गोंजारी, विभागीय व्यवस्थापक परिवहन महामंडळ, सोलापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT