Farmer Loan Waiver 
सोलापूर

Solapur Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या खात्यावर १२८ कोटी

आधार नंबर प्रमाणीकरण झाल्यानंतरच जमा होणार कर्ज रक्कम

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ३९४ शेतकऱ्यांना १२८ कोटी १० लाख ४४ हजार १६१ रुपये रक्कम कर्ज खात्यावर जमा करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरणानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जात आहे.

७ ऑगस्टपासून ऑनलाईद्वारे शेतकऱ्या्ंच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली. यामध्ये कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत ११ हजार ३९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील ७५, दक्षिण सोलापूर १२५, पंढरपूर ५५८, सांगोला २७६, माळशिरस ५९८, बार्शी १६७, करमाळा ४५७, मोहोळ ३४२, माढा ३४८, अक्कलकोट ९३ आणि मंगळवेढा ७३७ तसेच राष्ट्रीय व इतर बॅकेमार्फत १५ हजार ९५५ एकूण १९ हजार ७३१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शनिवारअखेर पूर्ण झाले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणीकरण करुन घेतल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

नवीन पीक कर्ज वाटप

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या सात बारा बेबाकी म्हणजे निल प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. त्यानंतर लगेच नवीन पीक कर्ज घेण्यासही शेतकरी पात्र होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT