सोलापूर

Solapur Theft Case: दहा लाखांच्या चोरीचा उलगडा

करमाळ्यातील घटना, दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा कुशल पद्धतीने तपास करू करून दोघांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. साधना जैन्या काळे (वय २७ रा. बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर) तसेच रावसाहेब उर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण ( रा सावडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर) असे आरोपीची नावे आहेत.

एका महिलेचे दहा लाख रुपये सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याचा तपास करत संशयित महिला चोरट्यास अटक केली. तिच्याकडून सहा तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले. या घटनेतील आरोपीला पकडण्यात यश मिळाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.

दहा लाखाचे सोन्याचे दागिने गेले होते चोरीस : मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील स्वाती धनंजय पुजारी (वय ३२) या करमाळ्यातील नातेवाईकांच्या लग्नासाठी आल्या होत्या. परत गावी निघाल्या असता गळ्यातील व कानातील सर्व सोने पर्स मध्ये ठेवले होते. हेे सोने अज्ञात चोरट्याने करमाळा बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना चोरून नेले होते.

पर्समध्ये २५ ग्रॅम सोन्याचा राणीहार, सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर, पाच ग्रॅम वजनाचे कानातील झूबे असे दहा लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा सुमारे १० लाख ६५ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. याबाबत स्वाती पुजारी यांनी करमाळा पोलिसांमध्ये फिर्याद दिली होती.

करमाळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्हीच्या सहाय्याने तपास केला. साधना काळे हिला संभाजीनगर मधून पकडले. तिच्याकडून चोरीचे सर्व सोने हस्तगत केले आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार अभिजीत मोहोळकर हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT