Solapur Housing Registration: जिल्ह्यात 1.45 लाख घरकुलांची नोंदणी Pudhari
सोलापूर

Solapur Housing Registration: जिल्ह्यात 1.45 लाख घरकुलांची नोंदणी

प्रधानमंत्री आवास योजना : लाभार्थ्यांना लवकरच घरकुले

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आतापर्यंत तब्बल एक लाख 45 हजार 500 घरकुलांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुल मिळणार आहे.

ग्रामीण भागातील बेघर, कच्च्या घरात राहणारे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांची ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येत आहे. महसूल, ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर अर्जांची छाननी सुरू होणार असून पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे.

उत्पन्न मर्यादा, घराची सद्यस्थिती, सामाजिक घटक आदी बाबींची तपासणी करून शासनाच्या निकषांनुसार लाभार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. तसेच अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची कारणे स्पष्ट केली जाणार असून पारदर्शकतेवर भर देण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत नवीन घरकुलांची नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत एक लाख 45 हजार 500 घरकुलांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या आदेशानंतर त्या अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात येणार आहे.
- चंद्रशेखर जगताप, प्रकल्प संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT