Solapur Burglary cases Pudhari
सोलापूर

Solapur Burglary cases: घरफोडीचे सहा गुन्हे आणले उघडकीस

आठ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत; ग्रामीण शाखेची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आणून सात लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. यातील अट्टल चोरटा तसेच सोने खरेदी करणारा सोनार यांना अटक करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे व. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील आणि त्यांचे पथक माळशिरस येथील घरफोडीचा तपास करीत होते. यामध्ये संशयित आरोपी दीपक पवार याने साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले (रा. चाकोरे, ता. माळशिरस) व भय्या शकिल शेख (रा. वेळापूर, ता. माळशिरस) या दोघांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. दीपक पवार याने या गुन्ह्यांची कबुली देत चोरीतील दागिने अकलूज येथील वैभव दिगंबर कुलथे या सोनारास विकल्याचे सांगितले. पोलिसांनी कुलथे याला अटक करुन त्याच्याकडून चोरीतील सात लाख 89 हजार रुपयांचे 52.60 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक भिमगोंडा पाटील, सलीम बागवान, विजयकुमार भरले, पल्लवी इंगळे, सागर ढोरे-पाटील, प्रमोद शिंपाळे, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, सुनंदा झळके, दिलीप थोरात, व्यंकटेश मोरे यांनी पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT