Sugar Factorie Pudhari
सोलापूर

Siddheshwar factory solapur: कर्ज नामंजूर झाल्याने सिद्धेश्वर कारखान्याच्या अडचणीत वाढ

ज्येष्ठ संचालक काडादी यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यास 199.94 कोटीचे कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या या कारखान्यापुढील अडचणी आता आणखी वाढणार आहेत.

राज्यातील सलग तीन वर्षे बंद असलेल्या आणि आर्थिक अडचणीतील 14 सहकारी कारखान्यांना कर्ज देण्याविषयी राज्य सरकारने राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे (एनसीडीसी) शिफारस केली होती. त्यापैकी सात कारखान्यांना तूर्तास कर्ज मिळणार नसल्याचे एनसीडीसीने स्पष्ट केले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्याने 199.94 कोटी रुपये कर्जाची मागणी केली होती.

श्री सिद्धेश्वर कारखान्याला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळांकडून कर्ज मिळावे यासाठी ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. भाजपच्या नेत्यांशी जुळवून घेऊन त्या दिशेने वाटचाल त्यांची सुरू होती. मात्र, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने कारखान्याला कर्ज नाकारल्याने आता काडादी कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

साखरेचे दर कमी असल्याने कारखाना अडचणीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडे कर्ज मागितले. त्यासाठी शासनाने गॅरंटी दिली होती. मात्र, महामंडळाने त्यामध्ये काही त्रुटी काढल्या आहेत. त्या दूर केल्यानंतर कर्ज मंजूर झाल्यास आर्थिक अडचणीतील श्री सिद्धेश्वर कारखाना बाहेर पडेल.
- धर्मराम काडादी, ज्येष्ठ संचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT