सोलापूर : दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मोहोळ रेल्वे स्थानकावर सर्वांच्या पाठपुराव्यामुळे सिद्धेश्वर एक्सप्रेसला थांबा मंजूर झाला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
कोरोना काळापासून सिद्धेश्वर एक्सप्रेसचा ( गाडी नंबर 12116 सोलापूर ते मुंबई व 12115 मुंबई ते सोलापूर) मोहोळ येथील थांबा बंद झाला होता. मात्र, खा. शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला. यावेळी त्यांच्या समवेत शाहीन शेख, सिमा पाटील,अॅड. श्रीरंग लाळे, सूरज शेख,विक्रांत दळवी, चंद्रकांत देवकते,व संतोष शिंदे उपस्थित होते.
मोहोळ आणि आसपासच्या भागात रेल्वे प्रवाशांची मोठी संख्या असून,तालुक्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना येणार्या भाविकांची गैरसोय होत होती. हा थांबा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होईल आणि वेळेची बचत होणार आहे.
वेळेची होणार बचत
मोहोळ तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि व्यापारी पुणे, मुंबई येथे वारंवार जा-ये करत असतात. मात्र, सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा बंद झाल्याने त्या प्रवाशांना नाहक त्रासाला समोर जावे लागत असे. तसेच सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करायचा असेल तर सोलापुरात यावे लागत असत. मात्र, आता पुन्हा थांबा मिळाल्याने प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
सिद्धेश्वर एक्सप्रेस रेल्वेस मोहोळ रेल्वे स्थानकावर पुन्हा थांबा मिळून दिल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील नागरिक, व्यापारी आणि शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खा. प्रणिती शिंदे यांनी थांबा मिळावा, यासाठी सातत्याने प्रतत्न केले.- संतोष पाटोळे, प्रवासी