पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी पाच कोटी 18 लाख रुपयांचे दान केले. सोन्या चांदीचे दागिनेही अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली.
कार्तिकी शुध्द 1 (दि. 22 ऑक्टोंबर) ते कार्तिकी शुध्द 15 (दि. 5 नोव्हेंबर) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ चार कोटी 80 लाख आठ हजार 289 रुपये अर्पण, एक कोटी 27 लाख 19 हजार 520 रुपये देणगी, 54 लाख 16 हजार 500 रुपये लाडू प्रसाद विक्री, 71 लाख 59 हजार 910 रुपये भक्तनिवास, एक कोटी 77 लाख 15 हजार 227 रुपये हुंडीपेटी, 50 हजार रूपये पुजा तसेच 33 लाख 36 हजार 876 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 67 लाख 906 रुपये उत्पन्न प्राप्त झाले.
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ चार कोटी 14 लाख एक हजार 314 रुपये अर्पण, 11 कोटी 69 लाख नऊ हजार 473 रुपये देणगी, 60 लाख 64 हजार 620 रुपये लाडू प्रसाद विक्री, 44 लाख 48 हजार 581 रुपये भक्तनिवास, 73 लाख 56 हजार 104 रुपये हुंडीपेटी, 10 लाख 72 हजार 681 रूपये पुजा तसेच पाच लाख चार हजार 15 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 46 हजार 534 रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते.
सन 2024 च्या कार्तिकी यात्रेत तीन कोटी 57 लाख 47 हजार 322 रुपये उत्पन्न मिळाले होते. या वर्षीच्या यात्रेत पाच कोटी 18 लाख 77 हजार 228 रुपये उत्पन्न मिळाले आहे. ते मागील यात्रेच्या तुलनेत एक कोटी 61 लाख 29 हजार 906 रुपयांनी अधिक आहे.