सोलापूर

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

अमृता चौगुले

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनलने बाजी मारली असून पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. सत्ताधार्‍यांविरोधात परिवर्तन पॅनलने आव्हान दिले होते मात्र मतदारांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांनाच कौल दिला आहे.यामध्ये सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र निकाल जाहीरनियमित सोलापूर, संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान व त्यानंतर मतमोजणी पार पडली. येथील कुचन हायस्कूल आवारातील डी. आर. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये या मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.ए.गावडे यांनीकाम पाहिले. त्यांनी सत्ताधारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची घोषणा केली.

या रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्यासह कुचन-सादूल-बोमड्याल गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. सत्ताधार्‍यांविरोधात परिवर्तन पॅनलने आव्हान उभे केले होते, परंतू मतदारांनी सत्ताधाऱ्यांनाच कौल दिला.

हे उमेदवार झाले विजयी !

श्री मार्कंडेय सोलापूर रुग्णालयाच्या या निवडणुकीत वैयक्तिक मतदारसंघातून लक्ष्मीनारायण कुचन, श्रीनिवास कमटम, अशोक आडम, राजेशम येमूल, पार्वतय्या श्रीराम, संस्था मतदारसंघातून अविनाश बोमड्याल, रमेश विडप, इरेशम कोंपेल्ली, मनोहर अन्नलदास, विनायक कोंड्याल तर ओबीसी मतदारसंघातून सुरेश फलमारी हे विजयी झाले आहेत.

थोड्याच मतांनी नागेश वल्याळ यांचा पराभव !

परिवर्तन पॅनलचे उमेदवार व माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांचा पराभव झाला. अवघ्या 13 मतांनी त्यांना पराभव झाला आहे. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल मधील मनोहर अन्नलदास वगळता उर्वरित सर्व उमेदवारांना भरघोस अशी मते मिळाली.

या उमेदवारांचा झाला पराभव ! 

या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये मनोहर इगे, गणेश पेनगोंडा, अ‍ॅड, राजगोपाल विडप, व्यंकटेश दोंता, श्रीनिवास कोंडा (वैयक्तिक मतदारसंघ), नागेश वल्याळ, श्रीहरी इराबत्ती (संस्था मतदारसंघ), नागेश वल्याळ (ओबीसी मतदारसंघ) यांचा पराभव झाला आहे.

SCROLL FOR NEXT