File Photo
सोलापूर

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सात जणांवर गुन्हा

एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : चारित्र्यावर संशय घेऊन नांदविण्यास नकार देत घटस्फोट देणार आहे. जे काही आहे, ते कोर्टात बघू. आम्हाला येथे काही बोलायचे नाही, असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मेघा नितीन मंताटी (वय 22, रा. 277, पिट्टानगर, विडी घरकुल) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पती नितीन मंताटी, सासरे श्रीनिवास मंताटी, सासू रजनी मंताटी, अंबादास म्हंता, भारताबाई मंताटी, सागर मंताटी, अक्षय मंताटी (सर्व. रा. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 28 जानेवारी 2023 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान फिर्यादीच्या सासरी घडली.

यात अधिक माहिती अशी की, फिर्यादी या सासरी नांदत होत्या. यातील संशयित आरोपींनी मिळून फिर्यादीस नांदविण्यास नकार दिला. फिर्यादीने समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना घेऊन बैठक केली. याठिकाणी संशयित आरोपींनी फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला नांदविण्यास नकार दिला. तसेच घटस्फोट देणार आहे व जे काही आहे ते कोर्टात बघू. आम्हाला येथे काही एक बोलायचे नाही, असे म्हणून बैठकीतून निघून गेले. तरी भविष्यात संशयित आरोपींकडून फिर्यादीस चांगले नांदवितील याची खात्री नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT