Server down issue Pudhari
सोलापूर

Solapur server down issue: सर्व्हर डाऊनमुळे दाखल्यांचे काम ठप्प

अडचणीत वाढ; नागरिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : करमाळा तालुक्यातील सर्वच 563 आपले सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र तसेच सेतू सुविधा केंद्र या सर्वच ठिकाणी सर्व्हरने माना टाकल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून निघणारे सर्व दाखल्याचे काम ठप्प झालेे आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सोमवारी मिटल्यानंतर कसेतरी सर्व्हर तासभर चालू झाल्यानंतर पुन्हा बंद पडलेले आहे. परिणामी गेल्या आठवड्याभरापासून सर्व प्रकारचे दाखले निघणे बंद झाले आहे .त्यामुळे आधी शासकीय कर्मचाऱ्यांमुळे तर आता सर्व्हरमुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

करमाळा तालुक्यामध्ये शेकडोच्या संख्येने सेवा केंद्र आहेत. अनेक ठिकाणी सेवा केंद्र ठरवून दिलेल्या ठिकाणी कार्यरत नाहीत. ग्रामीण भागातील ‌‘आयडी‌‘ करमाळा शहरात वापरून ग्रामीण भागातील लोकांची अडचण निर्माण केली जात आहे. या केद्रामध्ये दरपत्रक ही लावलेले नसतात. तक्रार निवारण केंद्रासाठी ‌‘क्यू आर कोड‌‘ ही लावलेला नसतो. अशा काही खाजगी सेतु सुविधा केंद्रात अवाच्या सव्वा पैसे दाखले घेताना घेतले जातात अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे लोकाना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

अशा विविध अडचणीच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. सदरची बेकायदेशीर चालणारे सेतु सुविधा सेवा केंद्र हे मंजुरीच्याच ठिकाणी सुरु असावेत अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT