Solapur Railway File Photo
सोलापूर

Solapur Railway: सोलापूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

दुहेरीकरणाच्या कामामुळे काही गाड्यांवर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात दौंड-मनमाड यादरम्यानच्या मार्गावरील विसापूर-रांजणगाव-सारोळा या स्थानकांवर रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचे सुरू आहे. या कामामुळे आज, बुधवारपासून विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत असून या तांत्रिक कामांचा परिणाम हा विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांवर होणार आहे. काही एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदलही केले आहेत. तर काही गाड्या विलंबाने धावतील.

बदललेले रेल्वे मार्ग (डायव्हर्शन) : गाडी क्रमांक 12627 (केएसआर बेंगळुरू - नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस) ही गाडी दि.27 आणि 29 मे) रोजी तिच्या नियमित मार्गाऐवजी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - परभणी - छत्रपती संभाजीनगर - मनमाड अशी वळवली आहे. गाडी क्रमांक : 20657 एसएसएस हुबळी - हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस शुक्रवार ( दि. 29) रोजी धावणारी गाडी नियमित मार्गाऐवजी सोलापूर - कुर्डूवाडी - लातूर रोड - परभणी - छत्रपती संभाजीनगर - मनमाड मार्गे धावेल.

गाड्यांचे नियमन (रेग्युलेशन): गाडी संख्या 12628 नवी दिल्ली - केएसआर बेंगळुरू कर्नाटक एक्स्प्रेस शुक्रवार ( दि. 29) रोजी सुटणारी ही गाडी सोलापूर ते दौंड दरम्यान सुमारे 1 तास 30 मिनिटे रोखून धरली जाईल. यामुळे ती विलंबाने धावेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT