सोलापूर : आराम बसने बाजूने धडक दिल्याने पिकअप रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या अपघातात 13 जण जखमी झाले होते. त्यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर जवळील पठाणबाबा दर्ग्याजवळ मंगळवारी (दि.25) सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला होता. जखमींना ताबडतोब सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील वत्सला नारायण चवरे (वय 70) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तर लोचना नामदेव चवरे (वय 80) व शहाजी नारायण चवरे (वय 50) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. परमेश्वर नामदेव चवरे, मैना अण्णा नाळे, रामहरी नामदेव चवरे, कौशल्या मदने, शकुंतला भगवान चवरे, मोहन कृष्णा चोरमले, कौशल्या शहाजी चवरे, ज्ञानेश्वर भगवान चवरे हे जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्मिला चंद्रकांत धायगुडे व आश्विनी देविदास सलगर या किरकोळ जखमी झाल्या आहेत. याबाबत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.