Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala  
सोलापूर

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala : तुकोबारायांच्या स्वागतासाठी अकलूजकरांची जय्यत तयारी

दि. २० जुलै रोजी अकलूज येथे पालखी; सुरक्षेकरिता शहरांमध्ये ९२ ठिकाणी सीसीटीव्हीची राहणार नजर

पुढारी वृत्तसेवा

रवि शिरढोणे

अकलूज : श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अकलूजनगरी सज्ज झाली असून वैष्णव्यांच्या सुविधेसाठी नगरपरिषदेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सदरचा पालखी सोहळा लाखों वैष्णवांसह दि. २० जुलै रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे सकाळी ८ वाजता प्रवेश करणार आहे. याकरिता अकलूजनगर परिषद २४ तास पाणीपुरवठा सुरू ठेवणार असून शहरातील पाण्याच्या टाक्या व २४ बोरवेल उपलब्ध असून एक सार्वजनिक विहिरी व ६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे . हातपंप, विहिरी व परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.

पालखी सोबत असणाऱ्या जड वाहनांना विशेष मार्ग उपलब्ध करून सुरक्षेसाठी बेरिंगेटींग करण्यात येत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून पालखी व दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी मुरमीकरण व सपाटीकरणांची काम सुरू आहे.

शहरातील स्ट्रीट लाईट पोल व विविध ठिकाणी विद्युत सुविधा पुरवण्याबरोबरच १४ ठिकाणच्या फिरत्या शौचालय ठिकाणीही विद्युत खांब उभारण्याचे काम सुरू आहे. नगरपरिषदेच्या २० घंट्या गाड्या मार्फत स्वच्छता करण्यात येत असून याकरता विशेष कर्मचारी टीम तैनात करण्यात आली आहे.

पालखी तळ व १३ दिंडी मुक्काम ठिकाणी फिरते शौचालय व त्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये सदाशिवराव माने विद्यालय मुक्काम ठिकाणी १००, शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी१००, कृषी उत्पन्न बाजार समिती १००, नवीन बाजार तळ ५०, विजयसिंह मोहिते पाटील क्रीडासंकुल १००, एमटीडीसी ५०, नामदेव मंगल कार्यालय १००, मसुदमाळा १०० अकलाई देवी मंदिर परिसर ५०, बहुउद्देशीय सभागृह ५०,पाठीदार भवन ५०, शिवरत्न मोटर्स ५०, सावतामाळी नगर माळेवाडी ५०, सराटी नदी बाजूला ५०, संत नरहरी नगर ५०, मुस्लिम कब्रस्तान समोर ५०, प्रतापसिंह चौक पुढील बाजूस ५०, उदयरत्न टाऊनशिप ५० असे एकूण १२०० फिरते शौचालय उपलब्धत करण्यात येणार आहेत.

पालखी मुक्काम असणारे ठिकाणी आपत्कालीन कक्ष, चौकशी कक्ष, आरोग्य कक्ष, तसेच हिरकणी कक्ष देखील नगर परिषदेमार्फत उभारण्याचे काम सुरू आहे. तर सुरक्षे करिता शहरांमध्ये ९२ ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार असून शहरातील मुख्य चौकात असणाऱ्या स्पीकर द्वारे भाविकांना आवाहन करण्यात येणार आहे. सदाशिवराव माने विद्यालय येथे पालखी रिंगण सोहळ्याकरिता गोल बांबूचे बेरेगेटींग तयार करण्यात येत असून विविध ठिकाणच्या सुविधा दर्शवणारे माहितीचे डिजिटल फलक ही लावण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT