Sangola Murder News
महुद येथील खून प्रकरणी तिघांना अटक Pudhari File Photo
सोलापूर

सांगोला : किरकोळ कारणावरून तरूणाचा कोयत्याने खून; तिघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून धारदार कोयत्याने तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना महुद येथील समाज मंदिराजवळ गुरुवारी (दि.११) रात्री दहाच्या सुमारास घडली. सुनील अनिल कांबळे (वय ३२. रा. महूद, सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी शुभम उर्फ आबा भागवत जाधव, ऋषीकेश उर्फ गोट्या भिमराव शिरतोडे (दोघेही रा.रामोशी गल्ली महूद) सोनू उर्फ अनिल यशवंत चव्हाण (रा. महूद बु।। ता. सांगोला) या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ऋषीकेश उर्फ गोट्या भिमराव शिरतोडे आणि सोनु उर्फ अनिल यशवंत चव्हाण यांनी साठेनगर समाजमंदीराजवळ येऊन गणेश लोखंडे आणि सुनिल कांबळे या दोघांना बुधवारी (दि. 10) झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन तुम्हाला बघुन घेतो, सोडत नसतो, अशी धमकी देवून निघुन गेले. लगेच रात्री 10:15 च्या सुमारास शुभम उर्फ आबा भागवत जाधव व ऋषीकेश उर्फ गोट्या भिमराव शिरतोडे यांनी साठेनगर येथील समाज मंदीर येथे मागील भांडणाच्या रागातून चिडुन सुनिल अनिल कांबळे यांच्या डोक्यात, मानेवर, हातावर, छतीवर, पोटावर वार करुन त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यामध्ये कोयत्याचे घाव वर्मी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. ऋषिकेश उर्फ गोट्या भीमराव शिरतोडे याला कोर्टात हजर केले असता १९ जुलै पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली तर दुसरा आरोपी शुभम उर्फ आबा भागवत जाधव हा अल्पवयीन असल्याने सोलापूर येथे बाल सुधार गृह येथे पाठवण्यात आले तर तिसरा आरोपी सोनू उर्फ अनिल यशवंत चव्हाण याला शनिवारी (दि.१३) कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे

SCROLL FOR NEXT