सांगोला; पुढारी वृत्तसेवा : सांगोला तालुक्यात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. काळूबाळूवाडी या गावात ही घटना घडली. भगवांन शामराव व्हनमाने (वय ४० वर्षे ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यात सर्वत्र वादळी वारे मोठ्या प्रमाणात झाले. या वादळी वाऱ्यात झाडे उन्मळुन पडली विजेचे खांब पडले. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसाची फक्त एक सर झाली. काळूबाळूवाडी येथील भगवान व्हनमाने हे शेळ्या चरण्यासाठी गेले होते. साडेतीन वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने ते जागीच मरण पावले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे.