gutkha seizure Pudhari Photo
सोलापूर

Sangola gutkha seizure: सांगोल्यात दीड लाखाचा गुटखा, तंबाखू जप्त

सनगर गल्ली, सांगोला येथील राजमाता पानमसाला स्टोअर्स या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : सनगर गल्ली, सांगोला येथील राजमाता पानमसाला स्टोअर्स या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत 1 लाख 58 हजार 285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकान सीलबंद करण्यात आले आहे. या प्रकरणी दुकान मालक निशांत ऊर्फ टिल्लू महादेव मिसाळ (वय 32) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 26) दुपारी गस्तीदरम्यान सनगर गल्लीतील या दुकानात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने धाड टाकली. दुकान बंद असल्याने संबंधितांना बोलावून पंचांसमक्ष दुकान उघडण्यात आले.

तपासणी दरम्यान डायरेक्टर पानमसाला, आरएमडी पानमसाला, बाबा 120 पानमसाला, विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच तयार मावा असा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करून सांगोला पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला. ही कारवाई सांगोला पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली. फिर्याद अन्न सुरक्षा अधिकारी उमेशचंद्र भुसे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT