Accident  Pudhari
सोलापूर

Sangola Car Accident : भरधाव कार डोंगरगाव ओढ्यात पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू, तिघे जखमी

तिघा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : डोंगरगाव, ता. सांगोला येथील ओढ्यामध्ये भरधाव कार पडल्याने ओढ्यातील पाण्यामध्ये बुडून गौतम गुलाब सरतापे (वय 70, मूळ रा. महूद, ता. सांगोला, सध्या रा. शहा लॉन्स पाठीमागे, पंढरपूर) व नाथन रामचंद्र केंगार (70, मूळ रा. तिसंगी, ता. पंढरपूर, सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे), हे मरण तर तिघे जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था डोंगरगाव संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर, मृत गौतम सरतापे व नाथन केंगार प्रभा यादव, नीता आवळे असे पाचजण मिळून कारमधून जुनोनी-हटकर मंगेवाडी-राजगेवाडी ते डोंगरगाव गावाकडे येत होते. चालक नाथन केंगार यांचे नियंत्रण सुटलेली कार थेट गावालगत ओढ्यातील पाण्यात पडली. या अपघातात सीटबेल्ट न निघाल्यामुळे कारमधील पुढील सीटवरचे गौतम गुलाब सरतापे (वय 70, मूळ रा. महूद, ता. सांगोला, सध्या रा. शहा लॉन्स पाठीमागे, पंढरपूर) व नाथन रामचंद्र केंगार (70, मूळ रा. तिसंगी, ता. पंढरपूर, सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे), पाण्यात बुडून मरण पावले, तर पाठीमागील सीटवरील ललित बाबर, प्रभा सुरेंद्र यादव (रा, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा), नीता रावसाहेब आवळे (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हे दैव बलवत्तर म्हणून बचावले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. याबाबत ज्ञानेश्वर ठोकळे (रा. डोंगरगाव) यांनी पोलिसांत खबर दिली असून, अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या अपघाताचा तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब भातुगडे हे करीत आहेत. कार ओढ्यात घुसल्याचे पाहताच संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोकळे, माजी उपसरपंच डी. एस. कांबळे, ॲड. सुनील जगधने, बाळासाहेब राजगे, बापू चव्हाण, अजय उथळे, सिद्धेश्वर बाबरसह स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कारमधील पाठीमागील सीटवरील ललित बाबर, प्रभा यादव व नीता आवळे यांना सुखरूप बाहेर काढले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT