आ. बाबासाहेब देशमुख, समाधान पाटील 
सोलापूर

Sangola News : सांगोला बाजार समितीला रेकॉर्डब्रेक नफा

कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला संस्थेची आ. बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी घोडदौड चालू आहे. संस्थेला १,८३,४३,६७२ रुपये इतका नफा झाला आहे. ही रक्कम संस्थेच्या इतिहासात प्रथमच नोंदवली गेलेली रेकॉर्डब्रेक वार्षिक नफा आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांना बाजारातील सुविधा सुधारण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सभापती समाधान पाटील यांनी सांगितले.

कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोलाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. ३० रोजी उत्साहात पार पडली. या सभेला शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलार, आडते तसेच स्थानिक जनप्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी ते बोलत होते.

सचिव उत्तम खोकले यांनी सांगितले की, बाजार समिती ही शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम करणारी महत्त्वाची संस्था आहे. सर्वांच्या सहकार्यानेच तिची प्रगती शक्य होते. लेखापाल महेंद्र वाघमारे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे सविस्तर वाचन केले. या वर्षात संस्थेला एकूण ३,२०,४८,५१३ रुपये इतके उत्पन्न मिळाले. याउलट खर्च १,३७,०४,८४१ रुपये झाला आहे. परिणामी संस्थेला १,८३,४३,६७२ रुपये इतका नफा झाला आहे. ही रक्कम संस्थेच्या इतिहासात प्रथमच नोंदवली गेलेली रेकॉर्डब्रेक वार्षिक नफा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आकडेवारीमुळे संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे आणि व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक असल्याचे सांगितले.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती समाधान पाटील होते. यावेळी उपसभापती माणिकचंद वाघमारे, संचालक विनायक कुलकर्णी, आबासाहेब आलदर, धनाजी पवार, रामचंद्र बाबर, अमजद बागवान, अमोल खरात, किशोर शिंदे, दीपक गोडसे, संतोष देवकाते, विष्णू सरगर, दगडू गावडे, हेमंतकुमार शिंदे, बाळासाहेब काटकर, चंद्रकांत करांडे, शोभा पवार, प्रमिला चौगुले आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT