घरकुल योजना  
सोलापूर

सांगोल्यातील ३ हजार २०३ लाभार्थांना मिळाला घरकुल योजनेचा पहिला हप्ता

गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : सन २०२४-२५ प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सांगोला तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ३ हजार २०३ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला असून ४ कोटी ८० लाख ४५ हजार रुपये रक्कम अदा करण्यात आली आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.२५) दिली.

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत, ग्रामीण भागातील गोर-गरीबांना घरे उपलब्ध करून दिली जातात. या योजनेचे उद्दिष्ट सर्व बेघर कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्के घर उपलब्ध करून देणे आहे. त्यानुसार सांगोला तालुक्यासाठी एकूण ५ हजार २८३ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यापैकी ४ हजार ६८७ लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ३ हजार २०३ लाभार्थ्यांना ४ कोटी ८० लाख ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT