सोलापूर ः महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी. pudhari photo
सोलापूर

शहरातील बेकायदा ‘पे अँड पार्क ’ बंद करा

मोफत पार्किंग चालू करा ः संभाजी ब्रिगेडने केली महापालिकेकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः सोलापुरात सध्या लोकसंख्या व वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून लूट केली जात आहे. लोकांची लूट करणार्‍यांचा ठेका रद्द करून तत्काळ कारवाई करावी. पे अँड पार्किंगच्या ऐवजी नागरिकांना मोफत पार्किंग द्यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक ‘पुढारी’ने सोलापुरात मक्तेदाराकडून वाहन चालकांची आर्थिक लूट, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष या मथळ्याखाली बुधवारी (दि. 9) वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत संभाजी ब्रिगेडने आंदोलन करत महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन दिले आहे.

महापालिकेच्या वतीने पे अ‍ॅण्ड पार्किंगचा ठेका दिला आहे. तो ठेका संपून सुद्धा पार्किंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात आहे. यास महापालिकेतील काही अधिकारी जबाबदार आहेत. सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी समावेश करण्यात आला. सोलापुरातील काही रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यामध्ये रस्ते अरुंद करण्यात येऊन फुटपाथ मोठे केले आहेत. त्या फुटपाथचा वापर काही लोक व्यवसायासाठी करत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. आयुक्तांनी संबंधित गोष्टीकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, शहर शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, सचिव सिद्धाराम सवळे, शहर संघटक सतीश वावरे, दिलीप निंबाळकर, अभिषेक जागीरदार उपस्थित होते.

शहरातील हुतात्मा बाग, रेवण मारुती मंदिर कंपाउंड लगतचा पे अँड पार्कचा मुक्ता संपला आहे. मक्तेदाराला नोटीस देऊन मुक्ता संपल्यानंतर केलेली वसुली त्याच्या वसूल करावी. या ठिकाणी मोफत पार्किंग करावी. अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
श्याम कदम, अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पश्चिम महाराष्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT