सोलापूर : श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त निघालेल्या रथ मिरवणुकीत हजारो भाविकांनी उत्साही सहभाग घेतला.
प्रारंभी आरती आणि पालखी पूजेनंतर रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. अग्रभागी सजवलेली बैलगाडी होती. त्या बैलगाडीत सनई चौघडा होता. त्यामागे बँड पथक होते. त्यानंतर सजवलेल्या बग्गीत श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज, श्री सद्गुरू दिगंबर इनामदार गुरुजी, श्री गुरू यशोदामाई इनामदार यांच्यासह विविध सद्गुरूंच्या प्रतिमा होत्या. सहभागी मंडळे विविध भजने सादर करत होते. सजविलेल्या पालखीत श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांची प्रतिमा आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या. सर्वात शेवटी महाराजांची मूर्ती असलेला, सजवलेला रथ भाविकांकडून दोराच्या सहाय्याने ओढला जात होता. परंपरेप्रमाणे संपूर्ण मिरवणूक मार्गावर हा रथ भाविकांनी ओढला.
उद्घाटन सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण आणि त्यांच्या पत्नी वैशाली पोमण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज मुलाणी, पोलिस निरीक्षक अमोल मिसाळ, चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाकचौरे, रवी गुंड, सुभाष बद्दूरकर, सम्राट राऊत प्रभाकर कुलकर्णी, रमेश देशमुख, प्रकाश कोथिंबीरे, दत्तात्रय कुसेकर, सम्राट राऊत, रामभाऊ कटकधोंड, मंदिराचे व्यवस्थापक निरंजन दंतकाळे परशुराम होटकर, प्रमोद महिंद्रकर, राहुल नल्ला, मल्लिनाथ व्हटकर आदी उपस्थित होते.
रथ मिरवणुकीने पुन्हा सद्गुरू श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात आला. यानंतर आरती, शेजारती आणि भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. रथ मिरवणूक मार्गावर भाविकांकडून रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जात होत्या.