File Photo
सोलापूर

आरटीई प्रवेशासाठी दहा मार्चपर्यंत मुदतवाढ

एक हजार सतरा विद्यार्थ्यांचा प्रवेश : उर्वरित प्रवेशासाठी पालकांची धावपळ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आरटीईसाठी जिल्ह्यातील एक हजार 17 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्यापही एक हजार 424 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. शासनाने मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना आता दहा मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील 286 शाळा पात्र ठरल्या असून, त्या शाळेमध्ये दोन हजार 443 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. एक हजार 17 जणांनी प्रवेश घेतला आहे. अद्यापही एक हजार 424 जणांचा प्रवेश बाकी आहे. आरटीई प्रवेशासाठी 28 फेबु्रवारी प्रवेशासाठी शेवटची संधी होती. शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये फक्त चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे शासनाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत उर्वरित विद्यार्थ्यांनी आरटीईसाठी प्रवेश घेणे गरजेचे आहे.

प्रवेश घेतलेले तालुकानिहाय विद्यार्थी

अक्कलकोट - 34, बार्शी -144, करमाळा - 86, माढा -83, माळशिरस - 162, मंगळवेढा - 31, मोहोळ - 80, पंढरपूर - 127, सांगोला -00, उत्तर सोलापूर - 8, दक्षिण सोलापूर - 72, सोलापूर शहर - 190 असे एकूण 1017 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

आरटीईच्या शिल्लक जागा

अक्कलकोट - 54, बार्शी - 166, करमाळा - 70, माढा - 154, माळशिरस - 116, मंगळवेढा - 46, मोहोळ - 70, पंढरपूर - 202, सांगोला - 192, उत्तर सोलापूर - 151, दक्षिण सोलापूर - 62, सोलापूर शहर - 141 अशा एकूण 1 हजार 424 जागा शिल्लक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT