RSS centenary: शताब्दीनिमित्त पथसंचलन File Photo
सोलापूर

RSS centenary: शताब्दीनिमित्त पथसंचलन

रा. स्व. संघाचे विजयादशमीपासून 16 नगरांमध्ये नियोजन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सकल हिंदू समाजाचे विशाल प्रकटीकरण, त्यासाठी पंच परिवर्तन केंद्रित कार्यक्रम रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षात होणार आहेत. येत्या 2 ऑक्टोबर (विजयादशमी) दसर्‍यापासून शस्त्रपूजन आणि संचलन सोलापूर शहरातील 16 नगरात आणि 57 ग्रामीण मंडल स्तरापर्यंत नियोजित केले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त टाकळीकर मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हा रा.स्व.संघाची व्यापक समन्वय बैठक पार पडली. पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीपराव क्षीरसागर, पुणे विभाग प्रचारक मंगेश बडवे, जिल्हा संघचालक सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे, जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाच्या व्यापक समन्वय बैठकीस संघ परिवारातील 31 जनसंघटना व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते.

सकल हिंदू समाजाचे प्रारूप विकसित करून हिंदू जीवनविचारांचा आधार भक्कम करण्यासाठी सकल हिंदू समाजाचा सहभाग वाढला पाहिजे. पंच परिवर्तन केंद्रित कार्यक्रम आणि उपक्रम केंद्र स्तरापासून ग्रामीण भागातील मंडल स्तरापर्यंत होणार आहेत. (विजयादशमी) दसरा शस्त्रपूजन आणि संघाच्या पथसंचलनात समाजातील सर्व घटकांना आमंत्रित केले जाणार आहे.

येत्या 2 ऑक्टोबरपासून संघशताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. संघ शताब्दी वर्षामध्ये डिसेंबरमध्ये गृहसंवाद अभियान, जानेवारी आणि फेब्रुवारीत सर्वत्र व्यापक हिंदू संमेलने होतील. पंच परिवर्तन बिंदूंवर समन्वय बैठकीत नियोजनावर गटनिहाय चर्चा झाली.

यावेळी क्षीरसागर आणि बडवे यांनी मार्गदर्शन केले. व्यापक समन्वय बैठकीचे जिल्हा सहकार्यवाह शिवानंद गंजी, संजीव सिध्दूल, शहर कार्यवाह शिवानंद कल्लूरकर, सहकार्यवाह प्रवीण चिक्कळी यांच्यासह आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT