सोलापूर

Bhima River Bridges: भीमा नदीवरील तीन पुलांच्या कामासाठी ७७७ कोटी रुपयांचा निधी

तीनही पुलांच्या कामाकरिता इंदापूर तालुक्याचे आमदार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : करमाळा तालुका व इंदापूर तालुक्यात भीमा नदीवर तीन ठिकाणी पूल उभारले जात आहेत. हे तीनही पूल तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी मंजूर केलेल्या ७७७ कोटी रूपयांच्या निधीतून उभारले जात आहेत. या पुलांमुळे ग्रामस्थांसाठी मोठी सुविधा होणार आहे.

या तीनही पुलांच्या कामाकरिता इंदापूर तालुक्याचे आमदार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे व करमाळ्याचे माजी आमदार संजय शिंदे यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.

तीन पुलांसाठी निधीची तरतूद

कोंढार चिंचोली, ता. करमाळा ते डिकसळ- ता. इंदापूर असणारा जुन्या ब्रिटीशकालिन पुलाचे अस्तित्व संपल्यामुळे नवीन पूल मंजुरीनंतर काम चालू आहे. याकरिता ५५ कोटींची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे.

कुगाव, ता. करमाळा ते शिरसोडी, ता. इंदापूर दरम्यान दुसरा पूल साकारत आहे. यासाठी तब्बल ३८२ कोटी रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे.

चांडगाव, ता. इंदापूर ते पोमलवाडी, ता. करमाळा दरम्यानच्या पुलाकरिता ३४० कोटी रुपये मंजूर असून त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. या तीनही पुलांना उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे नाव देणेबाबत ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

उजनी धरण काठावरील ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, मच्छीमार बांधवांनी कृषी पर्यटनाला चालना दिली पाहिजे, पर्यटन महामंडळाच्या योजना राबविल्या पाहिजेत, आपल्या भागात चांगले हॉटेल्स, कॉटेज, लॉजिंग, बोटिंग सेंटर या उद्योगांना चालना दिली पाहिजे. भविष्यात हा परिसर उजनी पर्यटन मार्ग म्हणून विकसित होणार आहे. शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचविण्यास मदत होणार आहे.
- अजित विघ्ने उपसभापती, पंचायत समिती करमाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT