Raju Khare Pudhari Photo
सोलापूर

Mohol constituency news: मोहोळ मतदारसंघासाठी 20 कोटींची तरतूद

आ. राजू खरे यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक रस्त्यासाठी निधी मंजूर

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 20 कोटी रुपयांची कामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी पाठपुरावा करत मंजूर करून आणली आहेत. या कामासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे हे विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना निधीची मोठी अडचण निर्माण झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आ. राजू खरे यांनी मागील महिन्यात मोहोळ मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 80 कोटी रुपयांच्या कामाची यादी देण्यात आली होती.

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना त्याबाबत सूचना देत, आमदार राजू खरे यांना निधी देण्याबाबत कळवले होते. त्यामुळेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 20 कोटी रूपयांची कामे मंजूर केली असून निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या मंजूर करण्यात आलेल्या पाच कामांमध्ये पंढरपूर तालुक्यातील रांजणी ते सरकोली ग्रामीण मार्ग 390/00 ते 6/00 मध्ये सुधारणा करण्यासाठी 6 कोटी, पंढरपूर, देगाव, सुस्ते, सिकंदर टाकळी, कुरुल या रस्त्यांसाठी 2 कोटी रुपये, मोहोळ स्टेशन, वडवळ, गोटेवाडी, फतेवाडी, कुरूल, सोहाळे ते राज्यमार्ग 6 ला जोडणारा रस्ता सुधारणा करण्यासाठी 5 कोटी, खंडाळी पापरी, पेनुर राज्यमार्ग 65 ते टाकळी सिकंदर रस्ता सुधारणा करण्यासाठी 4 कोटी, नजीक पिंपरी, शेजबाभूळगाव, अंकोली, कोथाळे, येणकी,जामगाव, कोरवली, हराळवाडी, कामती खुर्द या रस्त्याच्या विकासकामांसाठी 3 कोटी अशा एकूण पाच कामांसाठी 20 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT