लहान मुले, तरुणांमध्ये मोतिबिंदूच्या प्रमाणात वाढ 
सोलापूर

Eye Donation Day : लहान मुले, तरुणांमध्ये मोतिबिंदूच्या प्रमाणात वाढ

मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण अधिक

पुढारी वृत्तसेवा
आमसिद्ध व्हनकोरे

सोलापूर ः नेत्रदान करणारा माणूस हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. डोळ्याच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास कायमची दृष्टी जाण्यापर्यंत परिणाम होऊ शकतो. लहान मुले, तरुणांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण जास्त आढळते. नेत्रदानासह अवदानाविषयी समाजात जागरूकता दिसून येत नाही. नेत्रदान चळवळ वाढण्याची गरज आहे.

पूर्वी वयाच्या पन्नासी ओलांडलेल्यांना मोतीबिंदू आजार होऊन डोळ्याची नजर कमी होते. पुढे ते काचबिंदूत रूपांतर होते. त्याने डोळ्याची नजर जाते. मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण जास्त जाणवतो. शिवाय, एखाद्या औषधाच्या अतिसेवनाने देखील मोतीबिंदू पिकत असल्याचे निदर्शनास आले आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे धोक्याचे ठरू शकतो. पूर्वी शंभर वर्षापर्यंत डोळे चांगले असायचे, कारण, शारीरिक हालचाली व सकस आहार हे त्याचे मुख्य कारण होते. उन्हाळ्यात डोळ्याची काळजी जास्त घ्यावी लागते. टीव्ही व मोबाईलचा अतिवापरामुळे लहान मुलांचे डोळे कमकुवत होत असून त्यामुळेच बर्‍याच लहानमुलांमध्येही मोतीबिंदू झाल्याचे आढळून येतो. दरम्यान, लहान मुलांनी मोबाईल टाळावा, शाळेत असतानाही डोळ्यांची नियमित तपासणी गरजेची आहे. नंबर कमी असेल तर वेळीच लक्षात येत नाही. लहान मुले डोकं दुखत असल्याचे सांगितल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळोवेळी डोळ्याची तपासणी, शुगर बीपी नियंत्रित ठेवावी.

मृत्यूनंतर सहा तासातच मयत व्यक्तीचा डोळा दुसर्‍याला बसवता येते. मृत्यूचे कारण, तसेच एचबीएस एजी, एचसीव्ही ( हेपाटायटस बी) आणि एचआयव्ही याचे प्राधान्याने तपासणी केली जाते. नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करून डोळ्याचा पुढचा पडदा (सीओआरएनईए) काढून तो दुसर्‍या व्यक्तीला बसविला जातो. शिवाय, शुगर, बीपी असलेला माणूसही नेत्रदान करू शकतो.
डॉ. नीलेश बागुल, नेत्रविभाग, डॉ. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT