सोलापूर : राज्यात गेल्या एका वर्षात 1 हजारांपेक्षा जास्त शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. त्या शिक्षकांचे निवृत्तीनंतरचे पेन्शन अंशराशीकरन आणि उपदानाची जवळपास 250 रुपयांची रक्कम शासनाने थकवली आहे. त्यासाठी अनुदानाची तरतूद करावी, अशी मागणी सेवानिवृत्त शिक्षकांतून होत आहे.
राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातून एक हजारांपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षक सन 2024-2025 वर्षात सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे निवृत्ती नंतरचे पेन्शन अंशराशीकरन, उपदानाची रक्कम शासनाने थकल्याने सेवानिवृत्त शिक्षक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ थकीत रक्कम द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांच्याकडे केली आहे. मात्र, त्याकडे शासनस्तरावरून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा दावा सेवानिवृत्त शिक्षकांनी केला आहे.
राज्यात लाखो शिक्षक सेवेत आहेत. त्यातील दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात 150 ते 200 शिक्षक सेवानिवृत्त होत असतात. त्या शिक्षकांचे पेन्शन अंशराशीकरन, उपदानाची रक्कम शासनाने तत्काळ देणे आवश्यक आहे. मात्र, शासनाकडून ती वेळेवर मिळत नसल्याचे सेवानिवृत्त शिक्षकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
राज्यातील 1 हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन अंशराशीकरन, उपदानाची 250 कोटी पेक्षा जास्त रक्कम शासनाने थकवली आहे. रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी शासनाकडे सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही रक्कम मिळाली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.- राजाराम वरूटे, सेवानिवृत्त शिक्षक