Uday Samant: पंढरपूर एमआडीसीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा Pudhari
सोलापूर

Uday Samant: पंढरपूर एमआडीसीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा

उद्योगमंत्री उदय सामंत; आ. समाधान आवताडे यांनी पंढरपूर एमआयडीसी बाबत घेतली भेट

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर एमआयडीसी मार्गी लागण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच सूचना केल्या आहेत. त्यानुसार पंढरपूर एमआयडीसीच्या बाबतीत लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी मर्यादित वेळेत हा विषय सोडवा, अशा सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

आ. समाधान आवताडे यांनी पंढरपूर एमआयडीसीच्या संदर्भात विधान भवन मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याकरिता बैठकीत केलेला पाठपुरावा आणि वस्तुस्थिती मांडली.

आ. समाधान आवताडे यांचा पंढरपूर एमआयडीसी संदर्भात सातत्याने आणि पाठपुरावा केला आहे. हा प्रश्न तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित होता. ज्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दरम्यान, अर्थसंकल्प अधिवेशनात झालेल्या बैठकीत पंढरपूर एमआयडीसी हा विषय मार्गी लावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी एमआयडीसीचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT