सोलापूर : राज्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये कला, क्रीडा आणि संगणकांचे हजारो शिक्षक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. राज्यात एक हजार 497 जागेसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलविना राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांना न्याय मिळणार आहे.
राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शासकीय व खासगी आस्थापनामध्ये शिक्षकांची भरती होत आहे. त्यातच आश्रमशाळेत शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी शिक्षकांतून होत होती. त्या मागणीला अखेर यश आले असून, लवकरच पदे भरली जाणार आहेत. राज्यात अनेक आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये कंत्राटी पद भरतीवर येणार्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याच्या धोका टाळण्यासाठी शासकीय आश्रमशाळेमध्येही समग्र शिक्षाच्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळेमधील संगणक, क्रीडा आणि कला विषयाच्या एकूण एक हजार 497 शिक्षकांची पदे निविदास काढून बाह्य यंत्रणाद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जवळपास 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची भरती होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची भरतीच झाली नाही.
राज्यातील आश्रमशाळेतील भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली होती. तसेच आदिवासी क्षेत्राच्या परीक्षा बंदीसह इतर कारणांमुळे प्रक्रिया रखडली होती. मात्र, न्यायालय निकाल लागल्याने भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील बहुत चर्चेत आश्रमशाळेतील शिक्षकांची पदभरती करण्यासाठी येणार्या अडचणीला मात करून अखेर सामान्य प्रशासन विभाग वित्त विभागणी मंजुरी दिल्यामुळे हजारो पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी बाह्य यंत्रणांच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे.
क्रीडा, कला आणि संगणक शिक्षक हे गेल्या अनेक वर्षांपासून आश्रमशाळेत कंत्राटी पद्धतीने कामे करत आहेत. आश्रमशाळेत शिक्षक भरती काढल्याने कंत्राटी शिक्षकांना कायमस्वरुपी होण्याची संधी मिळणार आहे. अनेक वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम करणार्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी मिळाल्यावर त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल.- प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, डी.एड., बी.एड. असो.