सोलापूर

Solapur Rain alert: सोलापूर जिल्ह्याला आज पावसाचा अंदाज

सोलापूर शहर व जिल्ह्याला आज शनिवारी (दि. 9) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसेल, असा इशारा मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राने दिला

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्याला आज शनिवारी (दि. 9) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसेल, असा इशारा मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राने दिला.

दरम्यान, मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यात शुक्रवारी तापमानाचा पारा घसरला. 39.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर दिवसभर ऊन, सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी थंड वारे सुटल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

एप्रिल महिन्यातील 9 तारखेला 38.2 पुढे 10 एप्रिल रोजी 40 तापमान होते. एप्रिल अखेरीस तापमान 44 अंशापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर सलग 7 मेपर्यंत 28 दिवस कमाल तापमान 40 अंशावरच होते. गुरुवारी (दि. 7) पावसामुळे वातावरणात बदल होत तापमानात घट झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT