सोलापूर : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यात म्हणजे एप्रिल ते जुलै या दरम्यान तिकीट तपासणीच्या विविध पथकांनी केलेल्या विनातिकीट व वैध तिकीट नसलेल्या 85 हजार प्रवाशांवर कारवाई करत चार कोटी 28 लाख रुपये दंड सोलापूर विभागाने वसूल केला आहे. यासाठी विविध पथकाच्या कारवाईत मोठी रक्कम रेल्वेच्या तिजोरीत भर पडली आहे.
प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायक प्रवासाची सुविधा देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, रेल्वे नियमितपणे मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेनसह व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाईची मोहीम राबवावी लागते. स्थानक तपासणी, अचानक धाड तपासणी, किल्लाबंदी तपासणी, व्यापक तपासणी व मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा यात समावेश आहे. एप्रिल ते जुलै याच काळात मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकांनी वैध तिकीट अथवा प्रवास परवाना नसलेल्या सोलापूर विभागात 85,000 प्रकरणांमधून 4.18 कोटी रुपये.
मध्य रेल्वे अनियमित प्रवास रोखण्यासाठी व प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी काळजी घेतली जाते.
या विभागाकडून वेळोवेळी तिकीट तपासणीसाठी पथक नेमल जाते. याच पथकाकडून फुकट प्रवाशांवर कारवाई केली जाते. यातून रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे.योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक मध्य रेल्वे सोलापूर विभाग