ट्रकच्या धडकेत कारचा झालेला चक्काचूर  Pudhari
सोलापूर

Pune Solapur Accident | अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला: दीड वर्षाच्या चिमुकल्यासह २ महिलांचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर कोंडी येथे कारचा भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Pune Solapur Car Accident

बेलभंडारे पाकणी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे सोमवारी (दि.१८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी जाणारे कुटुंब पहाटे सहा ते सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कोंडी परिसरातून जात असताना त्यांच्या कारची ट्रकला जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत सिंधू रवी खंडागळे (वय ४२), नंदा भाऊराव हताळकर (वय ४५) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष यांचा मृत्यू झाला आहे. तर रुद्राक्षचे वडील यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्या आईवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT