सोलापूरसाठी पुण्याहून 1 मेपासून विमानसेवा 
सोलापूर

Pune Solapur Flight : सोलापूरसाठी पुण्याहून 1 मेपासून विमानसेवा

45 ते 50 मिनिटांत पुण्यातून सोलापुरात शक्य

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर ः सोलापूरमध्ये विमानसेवा पुरवणाऱ्या स्टार एअर या कंपनीस पुण्यातील लोहगाव विमानतळावर एक मेपासून स्लॉट मंजूर झाला आहे. त्यामळे आता पुण्याहूनही सोलापूरसाठी विमानाची कनेक्टिव्हिटी सुरू होत असून अवघ्या 40 ते 45 मिनिटांत पुण्याहून सोलापूरला पोहोचता येणार आहे.

या सेवेमुळे पश्चिम महाराष्ट्रात पुण्याशी विमानसेवेने जोडले जाणारे सोलापूर हे पहिलेच महानगर ठरणार आहे. पुणे ते सोलापूर या दोन महानगरांसाठी ही सातही दिवस सेवा उपलब्ध आहे. सोमवार ते शुक्रवार या काळात सोलापूरहून दुपारी अडीचच्या सुमारास विमानाचे उड्डाण होईल. ते विमान पुण्यात 40 ते 45 मिनिटांनी म्हणजे 3 वाजून 15 ते 20 मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दुपारी चार वाजता सोलापूरकडे विमानाचे उड्डाण होईल. 4 वाजून 40 ते 50 मिनिटांनी विमान सोलापुरात पोहोचेल. शनिवारसाठी सोलापूरहून 4 वाजून 20 मिनिटांनी विमान पुण्यात दाखल होईल, तर पुण्याहून सोलापूरसाठी 4 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण होईल.

विशेष तपशील

पुणे - सोलापूर - पुणे फ्लाईट क्रमांक एस 5-311/332 असा असेल

विमान पुण्यातून साधारणतः 45 मिनिटांत पुण्याहून सोलापूरला पोहोचेल

सोलापुरातून विमान पुण्यात पोहोचल्यावर काही काळातच देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व भागात पुण्यातून विमान कनेक्टिव्हिटी उपलब्ध या कनेक्टींग फ्लाईटचा सोलापूरकरांना खूप छान फायदा होऊ शकतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT