भरधाव येणाऱ्या ट्रकच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला Pudhari
सोलापूर

Solapur Accident | पुणे–पंढरपूर मार्गावर रस्ता दुभाजक ओलांडणे जीवावर बेतले; ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

पालखी मार्गावरील तोंडले-बोंडले येथील नंदाच्या ओढ्याच्या पुलावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Pune Pandharpur Highway Accident

श्रीपूर : तोंडले-बोंडले (ता. माळशिरस) : पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील तोंडले-बोंडले येथील नंदाच्या ओढ्यावरील पुलावर रस्ता दुभाजक (डिव्हायडर) ओलांडण्याचा प्रयत्न एका मोटारसायकलस्वाराच्या जीवावर बेतला. मागून भरधाव येणाऱ्या ट्रकच्या धडकेत मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी (दि.१४) सायंकाळी ५ च्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवरून प्रवास करणारे दोघेजण डिव्हायडर ओलांडून रस्ता पार करण्याचा प्रयत्न करीत असताना मोटारसायकल पुढे निघू शकली नाही. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच-४३ वाय-६९७९) मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात मोटारसायकल चालक शहाजी नामदेव पाटील (वय ५५, रा. करोळे) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सहप्रवासी मायाबाई शहाजी पाटील (वय ४५, रा. करोळे) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर महामार्ग आपत्कालीन सेवा आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वेळापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT