मोहोळ येथे आयोजित पदवीधर व शिक्षक मतदारांच्या आढावा बैठकीत बोलताना कुणाल पाटील  Pudhari
सोलापूर

Pune Graduate Constituency | पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना मताधिक्याने विजयी करा : कृणाल पाटील

भाजपचे निरीक्षक व माजी आमदार कृणाल पाटील यांचे मतदारांच्या आढावा बैठकीत आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Solapur BJP Campaign

मोहोळ शहर : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव तसेच शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी पदवीधर व शिक्षक मतदारांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे निरीक्षक तथा माजी आमदार कृणाल पाटील यांनी केले.

मोहोळ येथे सकाळी दहा वाजता आयोजित पदवीधर व शिक्षक मतदारांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. मतदारांशी संपर्क, संघटनात्मक तयारी आणि निवडणुकीच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीस पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना विजयी करावे या बैठकीत मा आ राजनजी पाटील यांच्यासह माजी आमदार यशवंत माने, अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष नाना चव्हाण, प्रकाश चवरे, सतीश काळे, रमेश माने, संजीव खिलारे आदी उपस्थित होते.

बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संपर्क वाढविणे, संघटनात्मक पातळीवर नियोजन करणे आणि निवडणुकीच्या कामाला गती देणे यावर भर दिला. पक्षाच्या उमेदवारांना अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT