सोलापूर : यंदा अनेक वर्षांनंतर पुणे विभागात पावसाने लवकरच जोरदार हजेरी लावल्याने पुणे विभागातील धरणातील पाणीसाठा 50 टक्क्यांच्या पुढे गेले आहे. अद्याप तीन महिने पावसाळा बाकी असून, पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनासाठी पाण्याची चिंता मिटली आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात मोठे, मध्यम, लघु असे सर्व प्रकारचे 720 धरणे (प्रकल्प) असून यात 27 जुलै रोजी 18 हजार 345.86 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला आहे. पाण्याची टक्केवारी ही 47.65 टक्के इतकी असून गेल्यावर्षी याच तारखेला 13.89 टक्के इतका पाणीसाठा आहे.
पुणे विभागामध्ये 35 मोठे प्रकल्प असून यात 15 हजार 394.75 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून, पाण्याची टक्केवारी ही 46.27 टक्के इतकी आहे. गेल्यावर्षी 11.53 टक्के पाणीसाठा होता. तर पुणे विभागामध्ये 50 मध्यम प्रकल्प असून यात 1 हजार 459.92 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला असून, 66.82 टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी 26.90 टक्के इतका पाणीसाठा होता. पुणे विभागामध्ये 635 लघु प्रकल्पात 1 हजार 491.02 दशलक्ष घनमीटर इतका पाणी पाणीसाठा असून, 41.29 टक्के इतका आहे. गेल्यावर्षी 22.15 टक्के इतका पाणीसाठा होता.
नीरा देवधरमध्ये 337. 39 दशलक्ष घनमीटर म्हणजे 10.2 टक्के, डिंबे धरणात 382.05 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.88 टक्के इतका पाणीसाठा आहे. भामा आसखेड 38.46 टक्के भरले असून येडगाव धरण 43. 52 टक्के तर चाकसमन 40.46 टक्के, वडीवळे 52.25 टक्के, घोड चिंचणी 78.76 टक्के, पवना 48.09 टक्के, भाटघर 40. 58 टक्के, खडकवासला 60.67 टक्के, पानशेत 41.64 टक्के, वरसगांव 49.97 टक्के, गुंजवणी 56.79 टक्के, टेमघर 30.29 टक्के, मुळशी टाटा 53.15 टक्के, वळवण टाटा 51.26 टक्के, वारणामध्ये 56.58 टक्के, ताराळीमध्ये 56.32 टक्के, घोममध्ये 50.36 टक्के, कोयनामध्ये 40.73 टक्के, कण्हेरमध्ये 37.77 टक्के, उरमोडीमध्ये 69.81 टक्के, वीरमध्ये 69.72 टक्के, उजनीमध्ये 69.6 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.