पंढरपूर : दै. ‘पुढारी’ च्या वर्धापन दिनी पंढरपूर विभागीय कार्यालयात शुभेच्छा देताना उपस्थित मान्यवर. Pudhari Photo
सोलापूर

दै. ‘पुढारी’ चा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Daily Pudhari Anniversary | पंढरपूर विभागीय कार्यालयात मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : गेल्या 86 वर्षापासून सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या दै. पुढारीच्या वर्धापनदिनानिमित्त येथील विभागीय कार्यालयात संस्थापक पद्मश्री डॉ. ग.गो. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगरसेवक विक्रम शिरसट, अनिल अभंगराव, डी. राज सर्वगोड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, अमरजीत पाटील, बेदाना असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ डोंबे, बाबा अधटराव, मुत्रागीर गोसावी, नितीन सरडे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, डॉ. दत्तात्रय व्हनमाने, प्राचार्य सिकंदर ढवळे, लक्ष्मण कारंडे, सोमनाथ कोताळकर, अ‍ॅड. सदानंद कारंडे, ग्राहक पंचायतीचे शशिकांत हरिदास, प्रा. अशोक डोळ, साहित्यिक कल्याण शिंदे, भास्कर बंगाळे, प्रा. धनाजी चव्हाण, ज्ञानेश्वर दुधाणे, मामा फलटणकर, मनोज भट्टड, मंगेश ठाकरे, महेश पटवर्धन, विनय उपाध्ये, नितीन कडलासकर, मधुकर गायकवाड, अकलूजचे रवी शिरढोणे, पिलीवचे दामोदर लोखंडे, भोसेचे सचिन तटाळे, उद्योगपती उदय लाड, महादेव जगपात, उपसरपंच बाळासो काकडे आदीसह सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रांतील मान्यवर, डॉक्टर व वकील संघटनेचे पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर कार्यालयाचे विभागप्रमुख सिद्धार्थ ढवळे, ब्युरो इंचार्ज सतीश यादव यांनी शुभेच्छा स्विकारल्या. याप्रसंगी सुरेश गायकवाड, अभिजीत पाटील, सागर कारंडे, अतुल ढवळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT