मृत प्रांजली यादव  Pudhari File Photo
सोलापूर

उच्च शिक्षण घेवून भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या प्रांजलीवर काळाचा घाला

पुणे येथे काँक्रीट मिक्सरखाली सापडून दुर्दैवी अंत; टेंभुर्णी परिसरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी : पुणे येथे आयटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत भविष्याची स्वप्न रंगविणाऱ्या प्रांजली यादव या कॉलेज तरुणीचा पुणे येथे दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने यादव कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मुळची टेंभूर्णीची असणारी प्रांजली शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. तिच्या मृत्यूने टेंभुर्णी शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रांजली व तिची मैत्रीण या दोघी स्कूटरवरून पुण्यातील माण म्हाळुंगे रस्त्यावरून जात असताना काँक्रीटने भरलेला मिक्सर भरधाव वेगात येऊन पलटी झाला. यामुळे प्रांजली व तिची मैत्रीण या दोघी या मिक्सरखाली दबल्याने त्यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दु.३ ते ३.३० च्या सुमारास घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, तो पलटी झालेला सिमेंट मिक्सर सरळ करण्यासाठी चार क्रेनची मदत घ्यावी लागली. तसेच मिक्सर सरळ करण्यास चार तासाचा अवधी लागला. प्रांजली ही आदल्या दिवशी आई-वडीलांची भेट घेऊन गेली होती. तसेच तिला आठ दिवसांपूर्वी नवी स्कूटर विकत घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT