सोलापूर

Solapur news: लालपरीच्या मार्गात खड्ड्यांचे अडथळे

नादुरूस्त रस्ता : पावसाळ्यापूर्वी दुरूस्तीची गरज

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसला खड्ड्यांचे अडथळे येत आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांनी भरलेली एसटी डुलत डुलत बाहेर पडते. रस्त्यावर ठिकठिकाणी असंख्य खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

मध्यवर्ती बसस्थानकात चोवीस तासात दोन हजाराहून अधिक संख्येने राज्य परिवहन महामंडळासह कर्नाटक, तेलंगणा आणि गोवा परिवहन महामंडळाच्या असंख्य एसटी बस यांची बसस्थानकात सतत ये-जा असते. या बस जेव्हा प्रवाशांना घेऊन बाहेर पडतात, तेव्हा या सगळ्याच बसेसना खड्ड्यांचा सामना करावा लागतो.

येथील मध्यवर्ती बसस्थानक आणि मध्यवर्ती कार्यशाळा या मार्गे जीएम चौकातून ती बाहेर पडते. सुमारे अर्धा किलोमीटरपेक्षा कमी अंतराचा असलेल्या या रस्त्यावरून एसटी बसची सतत ये-जा असते. धुळीमुळेही एसटी प्रवाशांना याचा त्रास होतो. एसटीच्या डुलण्याचा त्रास हा बसमधील गरोदर महिला आणि वृद्ध नागरिकांना होतो. एकूणच खराब रस्त्यामुळे प्रवाशांना त्रास तर होतोच पण एसटी बस वारंवार नादुरूस्त होण्याचेही प्रमाण वाढते.

पावसाळ्यापूर्वी करावी दुरूस्ती

जिल्हा प्रशासनाकडून या खराब झालेल्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती होणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात या खड्ड्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होईल. लालपरीच्या चालकांनाही खड्डे चुकवताना मोठी दमछाक होते. चालक व प्रवाशांना होणारा त्रास वाचवण्यासाठी या रस्त्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT