दहा हजारांची लाच घेणारा पोलिस हवालदार अटकेत. File Photo
सोलापूर

दहा हजारांची लाच घेणारा पोलिस हवालदार जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : चाप्टर केस करून अटक न करता सोडून देण्यासाठी विजापूर नाका पोलिस ठाणे येथील पोलिस हवालदाराने गुन्ह्यात दहा हजार रुपयांची लाच मागितली. ती घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.

तक्रारदारांकडून मागितली 25 हजारांची लाच

यातील आरोपी किरण देविदास म्हेत्रे यांनी तक्रारदार व त्यांचा मामेभाऊ यांच्या विरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात 325 कलम प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगून गुन्ह्यात अटक न करता चाप्टर केस करून तक्रारदारांना सोडून देण्यासाठी खासगी इसम रोहित नागेश गवड याच्यातर्फे तक्रारदारांकडून 25 हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती दहा हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम रोहित गवड यांच्या हस्ते स्वीकारल्याने दोन्ही आरोपीस ताब्यात घेवून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक उमाकांत महाडिक, शिरीष कुमार सोनवणे, पोलिस हवालदार अतुल घाडगे, श्रीराम गोखले, पोलिस शिपाई रोहित हटकेने, राहुल गायकवाड यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT