सोलापूर

Patient Rights: औषधे कोठूनही घेऊ शकता

रुग्णालयांची सक्ती चालणार नाही : अन्न व औषध प्रशासन

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : डॉक्टर किंवा रुग्णालयाने लिहून दिलेली औषधे रुग्णांना कोणत्याही शासनमान्य परवानाधारक मेडिकल स्टोअरमधून खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती डॉक्टर, दवाखाना किंवा रुग्णालय करू शकत नाही, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने म्हटले आहे.

ज्यातील रुग्णांच्या हितासाठी तसेच याबाबत रुग्णांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सर्व रुग्णालये, दवाखाने व आरोग्य संस्थांमध्ये या संदर्भातील माहितीचा फलक ठळकपणे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांनी आपल्या सोयीनुसार आणि विश्वासार्ह परवानाधारक मेडिकलमधून औषधे खरेदी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच औषधे खरेदी करताना औषधाची एक्सपायरी (कालबाह्यता) दिनांक, बॅच क्रमांक, एमआरपी आणि पॅकिंग सुस्थितीत असल्याची खात्री करूनच औषधे घ्यावीत. औषधाचे बिल घेणेही तितकेच महत्त्वाचे असून भविष्यात तक्रार करावयाची असल्यास त्याचा उपयोग होतो. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले असून, औषध विक्रीमध्ये सक्ती किंवा इतर कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

आधीच लिहून दिली जातात भरमसाठ औषधे

बहुतेक सर्व खासगी रुग्णालयांमधील मेडिकलमधून औषधे खरेदी करण्यास रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते. अव्वाच्या सव्वा औषधांची चिठ्ठी लिहून दिली जाते. जे जाणकार आणि हुशार लोक असतात, ते लागेल तेवढी औषधे घेतात आणि गोळ्या, औषधे जास्त प्रमाणात शिल्लक राहिले असतील तर मेडिकलमध्ये जाऊन परत करतात. मात्र बरेच रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक ही औषधे परत करत नाहीत, त्यामुळे औषधे आणि पैसे दोन्ही वाया जातात.

धडक कारवाईमुळे परिणाम

अन्न व औषध प्रशासनाचा कार्यभार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर लगेच खात्यांतर्गत येणाऱ्या विविध अन्न पदार्थ, हॉटेल, दूध डेअऱ्या, आईस्‍क्रीम पार्लर, हॉस्पिटल, मेडिकल, विविध प्रकारचे गुटखे, मावा, पान मसाले यासह सर्व विभागात धडक कारवाई सुरू केली. ज्यामुळे भेसळ पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे भेसळमुक्त खाद्यपदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नागरिकांना मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT