लांबोटी : येथे सडक सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियम मार्गदर्शन करताना पोलिस कॉन्स्टेबल भीमाशंकर जाधव. Pudhari Photo
सोलापूर

Child Driving Penalty : लहान मुलास गाडी देणार्‍या पालकांना होणार 25 हजारांचा दंड

लांबोटीतील आश्रम शाळेत वाहतूक नियम मार्गदर्शन

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ : प्रत्येकाने हेल्मेट, सीटबेल्ट वापरणे व सिग्नलचे पालनसह रस्त्यावर शिस्त पाळल्यास अपघात टाळले जाऊ शकतात. लहान वयातच विद्यार्थ्यांना वाहतूक शिस्त शिकवली, तर ते उद्याचे जबाबदार नागरिक ठरतील. अल्पवयीन मुलास वाहनचालवण्यास दिल्यास पालकास दोषी ठरवून त्यांना 25 हजार रुपयेपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो, असे पोलिस कॉन्स्टेबल भीमाशंकर जाधव यांनी व्यक्त केले.

सडक सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियम मार्गदर्शन कार्यक्रम माध्यमिक आश्रम शाळा लांबोटी येथे झाला. यावेळी ट्रॅफिक चिन्हे,गतीमर्यादा, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, ड्रिंक अँण्ड ड्राईव्हचे दुष्परिणाम तसेच मोबाईल वापराचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन झालेे.या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपनिरीक्षक कांचन गुरव,मुख्याध्यापक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन संदीप गायकवाड यांनी केले. यावेळी उपनिरीक्षक दीपक अवताडे, पोलिस कॉन्स्टेबल विशाल राठोडसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT