Pandharpur Vitthal Rukmini Temple 
सोलापूर

Pandharpur Vitthal Rukmini Temple : विठ्ठलमंदिर प्रवेशासाठी परदेशी भाविकांना ड्रेसकोड लागू थेट दर्शन!

पारंपरिक भारतीय वेशभूषेत आल्यास विठुरायाचे थेट दर्शन

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशातील भाविकांबरोबर विदेशी भाविकांना देखील भुरळ घातली आहे. विदेशातून येणाऱ्या परदेशी भक्तांसाठी प्रशासनाकडून ड्रेस कोड) (स्वतंत्र 'वस्त्रसंहिता)' लागू केली जाणार आहे. भारतीय संस्कृती आणि वारकरी परंपरेनुसार पोशाख परिधान केल्यासच परदेशी भक्तांना थेट विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

यासंदर्भात सविस्तर नियमावली (एसओपी) आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पंढरपुरात दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पावित्र्य आणि भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच परदेशी पाहुण्यांनाही वारकरी परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उद्देशाने परदेशी भाविकांना ड्रेस कोडचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेने या विषयावर चर्चा करून एकमताने हा ठराव पारित केला आहे.

हा प्रस्ताव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे देण्यात आला आहे .त्याची अंमलबजावणी कशी असावी, याचा आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. यामुळे आगामी काळात परदेशी भक्तांना , अभ्यासकांना पारंपरिक भारतीय वेशभूषेत सावळ्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे.

मंदिर समिती च्या भूमिकेकडे लक्ष

परदेशी भाविकांना विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भारतीय आणि वारकरी परंपरेला साजेसा पारंपरिक पोशाख (ड्रेस कोड) परिधान करणे बंधनकारक राहील. ड्रेस कोड चे पालन करणाऱ्या परदेशी भक्तांना मंदिरात थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी आणि वारकरी महाराज मंडळींच्या सल्लागार परिषदेच्या संयुक्त बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मंदिर समिती याबाबत काय भूमिका घेते? याकडे परदेशी भाविकांचे लक्ष लागले आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT