Pandharpur Vitthal Mandir 
सोलापूर

Pandharpur Vitthal Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीतील होणाऱ्या या पूजांची ऑनलाईन नोंदणी दि. 25 मार्च रोजी सकाळी 11 पासून सुरू होत असल्याची माहिती मंदिर समितीने दिली. भाविकांना पूजेची नोंदणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.

दि. 7 ऑक्टोबर 2024 पासून श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा टप्प्याटप्प्याने ऑनलाईन नोंदणीद्वारे भाविकांना उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांतील भाविकांचा पूजेच्या नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील टप्प्यात दि. 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व महानैवेद्य सहभाग योजना तसेच एप्रिलमधील तुळशी अर्चन पूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नोंदणीसाठी अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. अधिक माहिती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच समितीच्या दूरध्वनीवर भाविकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

महापूजेसाठी सेवामूल्य असे

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे 25 हजार ते 11 हजार

पाद्यपूजेसाठी 5 हजार

तुळशी अर्चन पूजेसाठी 2100 रु.

महानैवेद्य सहभाग योजनेसाठी 7 हजार देणगी मूल्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT