Pandharpur Vitthal Rukmini Temple Pudhari
सोलापूर

Pandharpur Vitthal Rukmini Temple : वज्रलेप प्रक्रियेनंतर विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुरू

शनिवार व रविवार वीकेंड असल्याने पंढरपूर भाविकांनी फुलले

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या चरणाची होत असलेली झीज थांबवण्यासाठी मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला. याकरिता तीन दिवस काम सुरू असल्याने भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. दि. २६ रोजी पुन्हा मंदिर सुरू करण्यात आले आहे. वज्रलेप करण्यात आल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे रूप पाहण्यासाठी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यातच शनिवार व रविवार वीकेंड असल्याने पंढरपूर भाविकांनी फुलले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर व राज्य पुरातत्त्व विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. संवर्धनाची संपूर्ण प्रक्रिया शास्त्रोक्त व अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने करण्यात आले. मूर्तींचे प्राचीन स्वरूप, धार्मिक पावित्र्य व परंपरा अबाधित ठेवण्यास विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.

तुळशी अर्चन पूजेची आजपासून ऑनलाईन नोंदणी

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दि. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरमधील होणाऱ्या तुळशी अर्चन पूजांची नोंदणी रविवार, दि. २७ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT