वारकरी दर्शन मंडप, स्काय वॉकच्या कामास आज प्रारंभ 
सोलापूर

Pandharpur Vithal Temple : वारकरी दर्शन मंडप, स्काय वॉकच्या कामास आज प्रारंभ

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन; मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत दर्शन मंडप व स्काय वॉकच्या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी 129 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्या कामाचे भूमिपूजन आज सोमवार, दि. 11 रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीच्या नियोजनाची पाहणी करण्यासाठी दर्शनरांगेत पत्राशेड येथे आले होते. त्यावेळी त्यांना दर्शन मंडप व स्काय वॉकसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत मंदिर समितीचा सहअध्यक्ष या नात्याने मंदिर समितीच्या वतीने गहिनीनाथ महाराज औसेकर विनंती केली होती. त्यानंतर राज्य शासनाच्या पुढाकारातून हा दर्शनमंडप आणि स्कायवॉकचे काम हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांबाबतचे प्रस्ताव तयार करून शासनास तत्काळ सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दिले होते.

तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यास उच्च स्तरीय मंंजुरी घेऊन रुपये 129.49 कोटीचा आराखडा राज्य शिखर समिती समोर सादर केला होता.

आराखड्यास शिखर समितीने मंजुरी देऊन दि. 11 ऑक्टोबर रोजी शासन निर्णय निर्गमित करून 13 कोटींचा निधी वितरीत केला होता. तद्नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी विहीत प्रक्रिया राबवून इंटरफेस डिझाईन असोसिएटस्‌‍, पुणे यांना कामाचा ठेका दिला आहे. स्कायवॉकची लांबी 1050 मी. असणार आहे. 2.4 मीटर आणि उंची 4 जमिनीपासून 7 मीटर उंचीवर पत्राशेडपासून पूर्व दरवाजापर्यंत केवळ ट्रांझिट असणार आहे, यामध्ये भाविक थांबणार नाहीत. जमिनीपासून 4 मीटर उंचीवर बांधण्यात येणार आहेत. भाविकांना विश्रांती म्हणून 1050 मीटर लांबीच्या स्कायवॉकमध्ये तीन विश्रांती क्षेत्र असणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांनाबाहेर काढण्यासाठी सहा ठिकाणी जिन्यांची व्यवस्था. चंद्रभागा घाट, श्री राम मंदिर आणि कुंभार घाट अशा तीन ठिकाणी प्रसाधनगृहे प्रस्तावित आहेत.

तसेच पब्लिक अड्रेस सिस्टिम, सिक्युरिटी एरिया, प्रथमोपचार सुविधा, प्रकाश व वायुविजन व्यवस्था, स्ट्रक्चरल स्टीलमधील बांधकाम काम गतीने पूर्ण होणार. सद्यस्थितीत पायाभूत सुविधांवरचा ताण कमी करण्यासाठी व गतीने स्कायवॉकचे बांधकाम करण्यासाठी स्टील स्ट्रक्चरचा वापर प्रस्तावित आहे. पावसाचे पाणी रोखण्यासाठी स्कायवॉकचे छत 1.5 मीटर ओव्हरहँग प्रस्तावित आहे.

चार मजल्यांचा असणार दर्शनमंडप

दर्शनमंडपाचे क्षेत्रफळ 16,185 चौ.मी.ऊसून स्टील्टमजला 5817 चौ.मी., तळमजला 4923 चौ.मी., पहिला मजला - 4,923 चौ.मी., दुसरा मजला- 522 चौ.मी.असेल. प्रत्येक मजल्याचे वैशिष्ठ आणि वारकरी क्षमता : स्टील्ट मजला उंची 4 मी. क्षमता 6000 भाविक. फस्ट, सेकंड व थर्ड फ्लोअर एका मजल्यावर 2000 वारकरी बसू शकतील असा दर्शनमंडप, 6000 भाविक, जमिनीपासून 4 मी. उंचीवर प्रकल्प सुविधा शौचालय, पिण्याचे पाणी, दर्शन सभागृह, अल्पोपहार काऊंटर, तातडीची वैद्यकीय सुविधा, हिरकणी कक्ष, मास एंट्री स्क्रीनिंग सिस्टम, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, सुविधा असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT