Train File Photo
सोलापूर

Pandharpur Tirupati train: सोलापूरकरांना बालाजीचे दर्शन होणार सुलभ

पंढरपूर-तिरूपती 16 मेपासून नियमित रेल्वे सुरू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर - तिरूपती ही साप्ताहिक रेल्वे आता 16 मेपासून नियमित सेवेत येणार आहे. नियमित धावणाऱ्या या गाडीमुळे विठू माऊलींची पंढरी ही भगवान व्यंकटेश्वराच्या तिरूपती नगरीशी जोडली जाणार आहे. सोलापूरहून तिरूपतीला बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

तिरूपतीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने रेल्वे प्रशासनाने पंढरपूर - तिरूपती - पंढरपूर ही गाडी नियमितपणे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित धावणाऱ्या या गाडीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या चार राज्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोळा कोचसह ही गाडी धावणार आहे.

गाडीचे हे आहेत थांबे

मोडलिंब, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, बीदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, काचीगुडा, शादनगर आदी स्थानकावर ही थांबेल.

असे आहे गाडीचे वेळापत्रक

तिरुपती - पंढरपूर साप्ताहिक रेल्वे (गाडी क्र. 17437 ) दर शनिवारी तिरूपती येथून दुपारी चार वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री सात वाजता पंढरपूरला पोहोचेल. तर पंढरपूर - तिरूपती साप्ताहिक (गाडी क्र. 17438) दर रविवारी पंढरपूर येथून रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (सोमवारी) रात्री 11.30 वाजता तिरूपतीला पोहोचेल.

पंढरपूर - तिरूपती - पंढरपूर या रेल्वेमुळे विठ्ठल नगरी आणि भगवान बालाजी नगरी जोडली जाईल. या रेल्वेगाडीमुळे शहर जिल्ह्यासह अन्य भागातील बालाजीच्या भक्तांना दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.
- सचिन पाटील, अध्यक्ष, जिल्हा प्रवासी संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT